अपराध समाचार
धक्कादायक…! बीडमध्ये पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवत दहा दिवस राहिला मुलांसोबत
- 185 Views
- December 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक…! बीडमध्ये पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवत दहा दिवस राहिला मुलांसोबत
- Edit
घरगुती कारणावरुन दहा ते बारा दिवसापूर्वी पत्नीची निर्घृणपणे हत्या करुन अर्धे शरीर जाळून टाकले. तर शरीराचा उर्वरित भाग फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी माजलगावमध्ये उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये या प्रकरणाचा तपास करुन पतीला ताब्यात घेतले.
बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. अशोकनगर भागातील नाल्याच्या कडेला जळालेल्या अवस्थेतील सांगाडा आढळून आल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अवघ्या चार तासांमध्ये या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा रेश्मा नावाच्या महिलेचा आहे.
दहा ते बारा दिवसापूर्वी पतीनेच तिचा खून करुन शरीराचा अर्धा भाग जाळून टाकला होता. तर उर्वरित भागाचे तुकडे करुन घरातील फ्रीज मध्ये ठेवले होते. संजय उर्फ अब्दूल रहेमान असे पतीचे नाव असुन बारा वर्षापूर्वी त्यांचा आंतरधर्मीय विवाह झाला होता. त्यांना अकरा वर्षाची मुलगी तर तीन वर्षाचा मुलगा असल्याची माहितीही समोर आली आहे. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिल्याचे सुत्रांनी सांगितले.