अपराध समाचार
मालदामध्येही महिलेचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह
- 252 Views
- December 06, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मालदामध्येही महिलेचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह
- Edit
हैदराबादधील बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच गुरुवारी पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्य़ातील आंब्याच्या बागेत एका महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाल्याने खळबळ माजली आहे. या महिलेवर बलात्कार करून त्यानंतर तिला जाळण्यात आले असावे, असा संशय एका पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.
या महिलेचा मृतदेह जळल्याने तिची ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, असे पोलीस उपअधीक्षक प्रशांत देवनाथ यांनी सांगितले. स्थानिक शेतकऱ्यांना या महिलेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आणि त्यांनी त्याबाबत पोलिसांना माहिती दिली.
ही महिला साधारणपणे २० वर्षे वयोगटातील असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्याचे आढळले आहे, मृतदेह शवविच्छेदनासाठी मालदा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.
महिलेला जाळण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला असल्याचे प्राथमिक तपासातून सूचित होत आहे. तिच्या मृतदेहाजवळ चपलांची जोडी आणि काडय़ापेटीतील अनेक काडय़ा आढळल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.