अपराध समाचार
शारजामध्ये सहाव्या मजल्यावरुन पडून भारतीय मुलीचा मृत्यू
- 247 Views
- December 09, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on शारजामध्ये सहाव्या मजल्यावरुन पडून भारतीय मुलीचा मृत्यू
- Edit
मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका अल्पवयीन भारतीय मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. शारजामध्ये रविवारी ही दुर्देवी घटना घडली. दोन दिवसातील ही दुसरी अशी घटना आहे. मृत मुलगी मूळची केरळाची आहे. शुक्रवारी शारजामध्येच एका अल्पवयीन मुलीचा १० व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता.
दोन्ही घटना आत्महत्येची संबंधित असल्याची शक्यता आहे. यासंबंधी तपास सुरु असून पोलिसांनी अद्याप अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही असे गल्फ न्यूजने म्हटले आहे. मृत मुलगी मागच्या दोन महिन्यांपासून मानसिक आजाराने त्रस्त होती. शारजा येथील क्लिनिकमध्ये तिच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती उम्म अल कुवैन शहराच्या पोलिसांनी दिली.
मुलीने डोक दुखत असल्याच्या तक्रार करुन झोपी जाण्याआधी औषधे घेतली होती अशी माहिती मुलीच्या नातेवाईकाने दिली. कचरा गोळा करायला येणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम या मुलीचा मृतदेह पाहिला व पोलिसांना माहिती दिली असे शेजाऱ्यांनी सांगितले. ही मुलगी शांत स्वभावाची होती. गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंब या इमारतीमध्ये राहते असे शेजाऱ्यांनी सांगितले.