अपराध समाचार
सर्पदंशामुळे पोलीस शिपायाचा मृत्यू
- 197 Views
- December 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on सर्पदंशामुळे पोलीस शिपायाचा मृत्यू
- Edit
नेहरूनगर येथील पोलीस वसाहतीमध्ये साप चावल्याने एका पोलीस शिपायाचा जागीच मृत्यू झाला. सुनील भगत (वय ३५) असे त्यांचे नाव असून ते पुणे पोलीस दलात कार्यरत होते.
नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये सुनील भगत गेल्या दोन वर्षांपासून पत्नी समृद्धी आणि मुलासह वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नीदेखील पोलीस दलात असून देवनार पोलीस ठाण्यात महिला पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.
रविवारी रात्री भगत कुटुंबीय घरात झोपेत असताना, रात्री साडेतीनच्या सुमारास अचानक सुनील भगत यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांनी पत्नीला उठवून, पाणी मागितले. पत्नी पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली असता, तिथे त्यांना साप दिसला. त्यानंतर त्यांनी तत्काळ नेहरूनगर पोलिसांच्या मदतीने सुनील यांना शीव रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नेहरूनगर पोलिसांनी सर्पमित्र सुनील कदम यांच्या मदतीने भगत यांच्या घरातील साप पकडला.