Menu

देश
कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांचे नुकसान

nobanner

चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते ही अफवा पसरल्याने राज्यातील पोल्ट्री उद्योग अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. लोकांनी चिकन खाणे बंद केल्यानं कोंबड्याची विक्रीत मोठी घट झाली. याचा फटका बसून राज्यातील पोल्ट्री उद्योगाचे ६०० कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ‘झी २४ मिडिया’शी बोलताना दिली.

राज्यात १०० मोठ्या पोल्ट्री कंपन्या आहेत. त्यांनी जवळपास १० हजार लहान पोल्ट्री फार्म युनिटशी करार केले आहेत. तर करार न केलेले हजारो पोल्ट्री फार्म राज्यात आहेत. त्यामुळे राज्यात या सगळ्या पोल्ट्री कोरोनाच्या अफवेने उध्वस्त झाल्या आहेत.