Menu

देश
कोरोनामुळ राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा विचार

nobanner

मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार सरकारचा करते आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. शासकीय कार्यालयात कामा निमित्त अनेक जण येत असतात. त्यामुळे शासन शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय़ घेतले आहेत. आज मंत्रालयात बैठक होत आहे. यामध्ये आणखी काही महत्त्वाचे निर्णय़ घेतले जावू शकतात.

याआधी सरकारने शाळा आणि महाविद्यालय 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला होता. सोबतच मॉल, सिनेमागृह तसेच गर्दी होणारी ठिकाणं बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सोबतच राज्यातील अनेक महत्त्वाची देवस्थानांमध्ये दर्शन देखील पुढीसल सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.