Menu

देश
तुमच्या सुरक्षित प्रवासासाठी ते झटतायत ! मुंबईकरांनो आता स्वच्छता राखण्याची जबाबदारी तुमचीही

nobanner

देशभरात सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातही राज्य सरकारतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना राबवल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३१ मार्चपर्यंत राज्यातील थेटर्स, मॉल, नाट्यगृह, जिम, स्विमींग पूल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचसोबत लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं यासाठीही सूचना देण्यात आल्या आहेत.

मात्र मुंबई लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना गर्दीचा सामना करावाच लागतो. मात्र यावरही रेल्वे प्रशासनाने उपाय शोधला आहे. गाडी शेवटच्या स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी सॅनिटाईजरने खिडक्या, दरवाज्याजवळील खांब, हँडल साफ करत आहेत. सोशल मीडियावर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे फोटोग्राफ व्हायरल झाले आहेत.

अनेकदा एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रवाशांकडून प्रशासनाला जबाबदार धरलं जातं. मात्र करोनाच्या प्रादुर्भावानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. अशावेळी आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. दरम्यान देशभरात आतापर्यंत ८० पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झालेली असून महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर या शहरात करोनाचे रुग्ण आढळले आहेत.