Menu

देश
३१ मार्चपर्यंत थिएटर राहणार बंद, मुख्यमंत्र्यांची घोषणा

nobanner

करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहं तसेच शाळा-कॉलेजेस ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत.

माध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, “करोनाचा वाढता धोका पाहता दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. तसेच ज्या शाळा आणि कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु आहेत ती सोडून इतर सर्व शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहतील.”

दरम्यान, असाच निर्णय दोन दिवसांपूर्वी केरळ सरकारनेही घेतला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांसह चित्रपटगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारण, केरळमध्ये करोना विषाणाच्या संसर्गाचे आणखी ६ संशयित आढळले आहेत.