देश
काऊंटडाऊन सुरु : दुपारी ‘या’ वेळेत अलिबाग, मुंबई किनाऱ्यावर ‘निसर्ग’ धडकणार
nobanner
अतिशय वेगानं अलिबाग, मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या निसर्ग नामक चक्रीवादळाला क्षणाक्षणाला रौद्र स्वरुप प्राप्त झालं आहे. पश्चिम किनारपट्टीवर तयार झालेल्या या वादळाचं एकंदर स्वरुप पाहता रायगडसह कोकणातील बऱ्याच किनारपट्टी भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रचंड वेगानं समुद्रातून पुढे सरकणारं हे वादळ बुधवारी दुपारी १ ते ३ वाजण्याच्या सुमारास अलिबाग आणि मुंबईत धडकणार आहे. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार ‘निसर्ग’ अलिबागपासून, ११५ किलोमीटर अंतरावर आहे. तर, मुंबईपासून हे वादळ साधरण १६५ किमी अंतरावर आहे. त्यामुळं वादळ आणि त्यासोबत घोंगावणारं संकट हे अगदी जवळ आल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
Share this: