देश
‘उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेलं पॅकेज थट्टा करणारं’
nobanner
उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेलं पहिलंच पॅकेज हे थट्टा करणारं असल्याची टीका भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
मच्छीमारांसाठी जाहीर केलेलं ५८ कोटी रुपयांचे पॅकेज हे फसवं असल्याची टीका चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत केली आहे. यामुळे मच्छीमारांना कोणता दिलासा मिळणार नाही, त्यांचे नुकसान भरून येणार नाहीये.
उलट गेल्यावर्षी मत्स्य दुष्काळामुळे जाहीर झालेल्या मदतीचे निकष हे जसेच्या तसे लावण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे मच्छीमारांचे जे नुकसान झाले आहे त्या तुलनेत ५८ कोटी रुपयांचे पॅकेज काहीच नसल्याची टीका भाजपने केली आहे.
Share this: