Menu

खेल
IPL 2020 : ‘रन’संग्रामासाठी अतिभव्य स्टेडियम सज्ज

nobanner

भारतात क्रिकेट हा खेळ अनेकांसाठी पूजनीय आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. अशा या खेळामध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धा म्हणजे अनेक क्रीडा रसिकांसाठी परवणी. यंदाच्या वर्षी IPL 2020 वर कोरोना व्हायरसचं सावट आहे.

असं असलं तरीही ही स्पर्धा यंदा दुबईमध्ये पार पडत आहे. तीसुद्धा तितक्याच उत्साहात. याचीच प्रचिती येत आहे या स्पर्धेसाठी सज्ज असणाऱ्या भव्य, अतिभव्य स्टेडियमकडे पाहून.

नुकतंच दुबई आणि अबूधाबी येथील स्टेडियमचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले. जे पाहून अनेकांचेच डोळे दीपले.

बीसीसीआयच्या सचिवपदी असणाऱ्या जय शाह यांनी स्टेडियमचे काही सुरेख फोटो शेअर केले.

स्टेडियम कितीही भव्य असले तरीही यंदा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यामध्ये चाहत्यांचा कल्ला दिसणार नाही. कारण स्टेडियममध्ये प्रेक्षक दिसणार नाहीत. असं असलं तरीही घरच्या घरी बसून, किंवा मित्रमंडळींच्या साथीनं प्रत्येकजण आयपीएचली मजा लुटणार हे मात्र नक्की.