देश
घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी, टोळीचा पर्दाफाश
nobanner
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅसची चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. वाघोली परिसरात लोणीकंद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरमधील गॅस काढून तो व्यवसायिक वापराच्या सिलिंडरमध्ये भरायचा आणि नंतर तो ब्लॅकने विकायचा असा उद्योग या टोळीने चालवला होता. सिलेंडरचा टेम्पो एका निर्जन स्थळी नेऊन हा धोकादायक प्रकार केला जात होता.
घरगुती सिलिंडरमध्ये गॅस कमी येत असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून येत होत्या. त्यानुसार पोलिसांनी गॅस एजेन्सीच्या टेम्पोवर पाळत ठेऊन गॅसची चोरीचा प्रकार उघड केला. ही टोळी प्रत्येक सिलेंडरमधून दोन किलो गॅसची चोरी करत होती. पोलिसांनी या रॅकेटमधील आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९४ सिलिंडरसह ५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
Share this: