देश
मुंबईसह राज्यभरात ऐन थंडीत पाऊस
मुंबईसह राज्याच्या सर्वच भागात आज पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सलग चौथ्या दिवशी पाऊस सुरू आहे. ऐन थंडीत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अवकाळी पावसामुळे शेतकरीही संकटात सापडला आहे. मुंबईत काल रात्रीपासून शहर आणि उपनगरात संततधार सुरू आहे. त्यामुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.
मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबई, वसई विरार या भागातही पाऊस सुरू आहे. या भागातून मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह इतर पिकं संकटात आहेत. तर नाशिक जिल्ह्यातही पावसाचा फटका शेतीला बसलाय. पावसामुळे द्राक्ष कांदा धोक्यात आलाय. धुळे, जळगावमध्ये दाट धुकं आहे. पुणे जिल्ह्यातही आंबेगाव तालुक्यात पावसासह धुकं पसरलं आहे.
रायगडमध्ये रिमझिम
रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. अलिबाग, माणगाव आणि रोहा तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. तर महाड, म्हसळा, श्रीवर्धन, पेण परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे.
या पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत. या अवकाळी पावसाचा फटका आंबा पिकाबरोबरच वाल, पावटा, भुईमूग, तूर यासारख्या कडधान्य पिकानाही बसतो आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस होत आहे . मागील ४ ते ५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. २ दिवसांपूर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.