देश
सातासमुद्रापार चालली सलमान खानची जादू, जाणून घ्या ‘राधे’ ची पहिल्या दिवसाची कमाई
जवळपास एका वर्षानंतर बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खानचा ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. आपला शब्द पाळत सलमानने ईदच्या मुहूर्तावर ‘राधे’ चित्रपट प्रदर्शित केला. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ‘राधे’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. भारतात तर चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला परंतु, परदेशात सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘राधे’ पाहण्यासाठी प्रेक्षकांच्या रांगा पाहायला मिळाल्या. यावरूनच परदेशातही सलमान किती लोकप्रिय आहे याचा अंदाज लावता येतो.
भारतात ‘राधे’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक इतके उत्सुक झाले होते की, चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी म्हणजेच दुपारी १२ वाजता जवळपास १५ लाख लोकांनी झी ५ वर लॉग इन केलं होतं. त्यामुळे सुरुवातीला तर झीचं सर्वर क्रॅश झालं होतं. सलमानच्या चित्रपटासाठीची हीच उत्सुकता दुबई आणि ऑस्ट्रेलियामध्येही पाहायला मिळाली. दुबईमध्ये फर्स्ट ग्लोबल प्रीमियर झालेल्या सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार परदेशात ‘राधे’ ने पहिल्या दिवशी ४० लाख डॉलर म्हणजेच २ कोटी ९४ लाख रुपयांची कमाई केली. चित्रपटासाठी ही एक मोठी सुरुवात मानली जात आहे.
येत्या वीकेण्डला ‘राधे’ आणखी चांगली कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, झीने सॅटेलाईट, डिजिटल आणि चित्रपटगृह यांच्या राइट्सची २३० करोडची डील केली आहे. प्रेक्षकांवर सध्या सलमानच्या ‘राधे’ ची जादू स्पष्ट दिसत आहे. एका युझरने चित्रपटाला पाच स्टार देत कौतुक करत लिहिलं, ‘राधे’ एका शब्दात सांगायचं तर ब्लॉकबस्टर आहे.’ इतरही अनेक प्रेक्षकांनी चित्रपटाचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ईदच्या मुहूर्तावर लाखो प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला आहे. आता वीकेण्डला चित्रपट किती कमाई करतो हे जाणून घेणं औसुक्याचं ठरेल.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.