देश
आताची मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क, असा आहे अॅक्शन प्लान
येत्या 3 मे म्हणजे ईदपर्यंत राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे (Loud Speaker) उतरवले गेले नाहीत तर त्यानंतर मशिदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्यात येईल, असा इशारा मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण कमालीचे तापलं आहे. तसंच राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे.
राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलीसही (Mumbai Police) सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अॅक्शन प्लान (Action Plan) तयार केला आहे.
मुंबई पोलिसांचा अॅक्शन प्लान
1 – शहरातील 94 पोलीस ठाण्यांमध्ये 1504 पॉइंट करण्यात आले आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात 4 बीट चौक्या आहेत. 24 तास पेट्रोलिंग केलं जाणार
2 – एसआरपीएफच्या (SRPF) 57 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. एका तुकडीत 26 पोलीस तैनात असतील. प्रत्येक तुकडीत स्थानिक शस्त्र विभागातील पोलीस असतील
3 – शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील क्षेत्रं निश्चित करण्यात आली आहेत.
4 – दंगल नियंत्रण पोलिसांच्या (Rapid Action Force) 6 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीत 14 पोलीस आहेत. याशिवाय डेल्टा टीमही तयार करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यातून दोन हवालदार तैनात करण्यात आले आहेत.
5 – दंग्याच्या ठिकाणी पोलीस 5 मिनिटात पोहोचतील, पोलिसांचा दावा
राज ठाकरे यांचा इशारा
मशिदींवरील भोंगे हा धार्मिक नव्हे तर सामाजिक विषय आहे. भोंग्यांचा त्रास फक्त हिंदूनाच होतो असं नाही, सर्वांनाच हा त्रास होतो. त्यामुळे जर 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर जशास तसे उत्तर देण्यास देशभरातील हिंदू बांधवांनी तयार राहावं, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. आम्हाला देशात कोणत्याही प्रकारच्या दंगली नको आहेत, त्यामुळे तुम्ही शांततेत भोंगे काढून घ्या अन्यथा आम्ही दिवसातून पाच वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवणार, असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.