Menu

आमदार रवी राणांना झटका, भोंग्याच्या मुद्यावर 35 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

New Project (39) (2)
nobanner

अमरावती, 21 एप्रिल : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackery) यांनी भोंग्याचा मुद्या उपस्थितीत केल्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपनेही (bjp) उघडपणे पाठिंबा दिला आहे. अमराती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा (ravi rana) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पण त्यांच्या या भूमिकेमुळे नाराज झालेल्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या निवडणुकीत आमदार रवी राणा  आणि खासदार नवनीत राणा हे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या पाठिंब्याने निवडून आले होते. सर्वधर्मीय पार्टी म्हणून आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाची (yuva swabhiman party) ओळख होती. मात्र राणा दाम्पत्य  यांनी भाजपला समर्थन दिले. हिंदुत्ववादी विचाराचा पुरस्कार  करीत असल्याने आम्ही सामूहिक राजीनामे देत असल्याची माहिती अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अयुब खान यांनी दिली आहे.

दरम्यान, आमदार रवी राणा (Ravi Rana)  यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीस म्हणण्यासाठी अखेर तारीख जाहीर केली आहे. 22 एप्रिलला आपण मातोश्रीवर जाणार असल्याचा इशारा राणा यांनी दिला.

आमदार रवी राणा यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी मुंबईत मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा म्हणणार अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडलेला आहे. त्यांनी हनुमान जयंतीनिमित्त मातोश्रीवर हनुमान चालीसाचे वाचन करावे अन्यथा मी व नवनीत राणा ‘मातोश्री’वर येऊन हनुमान चालीसाचे वाचन करू, असा इशारा रवी राणा यांनी दिला होता. रवी राणा यांच्या इशाऱ्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.



Translate »