Bhim Jayanti 2022 : इंदू मिल स्मारकासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
Ajit Pawar in Bhim Jayanti Indu Mill : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदू मिल स्मारकाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, राज्य सरकारचे इंदू मिल स्मारक संदर्भात लक्ष आहे. इंदू मिल स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होईल. निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही, अशा सूचना आम्ही केल्या आहेत. सिद्धार्थ कॉलेजसाठी 11 कोटी 45 लाख रुपये दिले आहेत. तिथे सुद्धा काम सुरू आहे, असं पवार म्हणाले.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 14, 2022
अजित पवारांनी म्हटलं की, महामानवाची आज जयंती आहे. बाबासाहेबांनी सर्वांना लढायचं बळ दिले. देशाला एकजूट ठेवता आली त्यात बाबासाहेबांच्या संविधानाचा वाटा खूप मोठा आहे. बाबासाहेब यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. शिका आणि संघटित घरी हा संदेश त्यांनी दिला. गरीब वंचित आणि दुर्बल घटकांसाठी ते लढले. याचे श्रेय त्यांना दिलेच पाहिजे. त्यांनी सर्वित्तम आणि सर्वोच्च संविधान देशाला दिले, असं पवारांनी म्हटलं आहे.
Dr. Babasaheb Ambedkar jayanti LIVE : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह, पाहा प्रत्येक अपडेट
त्यांनी म्हटलं की, बाबासाहेब खूप काही होते. ते काय नव्हते असा विचार करावा लागतो. त्यांच्या विचारात प्रचंड ताकद आहे.
अजित पवार म्हणाले की, धनंजय मुंडेंची तब्येत ठीक नाही. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची उणीव येथे जाणवते. धनंजय मुंडे यांना परवा चक्कर आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी स्मारक येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी भदन्त धम्मप्रिय यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,खासदार राहुल शेवाळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मुंबई महापालिकेचे सहआयुक्त किरण दिघावकर, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे व इतर मान्यवरांनीही अभिवादन केले.