Menu

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या सभेला मोठ्या प्रमाणात विरोध, औरंगाबादमध्ये ‘राज’ गर्जना होणार की नाही? आज होणार निर्णय

New Project (34) (11)
nobanner

औरंगाबाद, 20 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेतून 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमच दिला आहे. 3 मे पर्यंत जर भोंग्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही तर जशास तसे उत्तर देण्याचं म्हटलं. त्यासोबतच 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. पण या सभेला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे.

1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग, ऑल इंडिया पँथर सेना, वंचित बहुजन आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष आणि GAC संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

शहरातील एकता आणि शांती भंग होऊ शकते असं सांगत राज ठाकरेंच्या सभेला कडाडून विरोध होताना दिसत आहे. आता या संदर्भात औरंगाबाद पोलीस काय निर्णय घेतात हे पहावं लागेल. सभेला परवानगी मिळणार की नाही हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वाचा : भाजप-मनसे मिळून शिवसेनेला घेरणार; महाराष्ट्र दिनी फडणवीसांची मुंबईत सभा तर औरंगाबादेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार



Translate »