देश
मुंबईला हादवरणाऱ्या जुहू बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल, आरोपीला फाशीची शिक्षा
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर मुंबईला हादरवणाऱ्या आणखी एका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जुहू बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला दिंडोशी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
4 एप्रिल 2019 ला एका 9 वर्षांच्या मुलीचा मृतदेह गटारात सापडला होता.पोस्टमॉर्टममध्ये मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह गटारात फेकून दिला होता. या घटनेनं मुंबई हादरली होती. घटना उघडकीस आल्यानंतर जुहू परिसरात लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं.
याप्रकरणात जुहू पोलिसांनी 2019 मध्ये वड्डिवेल उर्फ गुंडप्पा देवेंद्र नावाच्या आरोपीला अटक केली होती. आरोपी गुंडप्पाने मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. आणि त्यानंतर तिचा मृतदेह गटारात फेकून दिला होता.
आरोपी वड्डिवेल उर्फ गुंडप्पा चिनातांबी देवेंद्र याला आज 11 व्या सत्र न्यायालयाने, दिंडोशी, मुंबई यांनी आयपीसी कलम 363,376,302,201 आणि POCSO च्या 4,8,12 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली.