Menu

देश
धक्कादायक | ‘सरल वास्तू’ फेम चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या

nobanner

कर्नाटकच्या हुबळीमध्ये वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर (Saral Vaastu Fame of Chandrashekhar Guruji) यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे हल्लेखोर शिष्याच्या वेषात आले होते. शिष्याच्या वेषात आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूचे तब्बल 70 वार केले. या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबल उडाली आहे. (saral vaastu fame of chandrashekhar guruji died at karnataka)

हुबळीच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ही घटना घडलीये. हल्लेखोर आधी चंद्रशेखर यांच्या पाया पडले. त्यानंतर दोघांनी मिळून चंद्रशेखर यांच्यावर सपासप वार केले. दोन्ही हल्लेखोरांना बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गा इथून अटक करण्यात आली. त्यांना हुबळी इथं आणण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.