Menu

देश
शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता अ‍ॅक्शनमोडमध्ये, थेट निवडणूक मैदानात

nobanner

आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना (Shiv Sena) निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. शिवसेनेतून बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. येत्या निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. रोजच बैठकांचा सपाटा ठाकरे यांनी लावला आहे.

नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असून, मातोश्रीवर जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. जिथं जिथं नगरपरिषद, नगरपालिकांच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 40 आमदारांसह बंडखोरी केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळं या निवडणुकीत शिवसेनेच्या अस्तित्वाची कसोटी असणार आहे.

राज्यातील 92 नगरपरिषदा, नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीच्यादृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आतापासून शिवसेना निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.

आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक  बोलावली. आज सकाळी  11.30 वाजल्यापासून मातोश्रीवर बैठक सुरु आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. ठाकरे यांनी शिंदे गटासोबत जे जे गेले आहेत, त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. काही ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.