Menu

देश
MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा मोठा निर्णय

nobanner

एसटी कर्मचाऱ्यांसाठी (MSRTC) आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने (Maharashtra Government) एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात एकूण 6 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (maharashtra government approves 6 percent hike on da for st employees)

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता दिला जातो. मात्र महागाई भत्ता वेळेवर दिला जात नसल्याची तक्रार एसटी कर्मचाऱ्यांची होती. मात्र आता या तक्रारीनंतर सरकारने महागाई भत्ता वाढवलाय. आधी हा महागाई भत्ता 26 टक्के होता जो आता 34 टक्के असणार आहे. त्यानुसार येत्या 7 डिसेंबरला कर्मचाऱ्यांना वेतनासह  महागाई भत्ता दिला जाईल. मात्र मागील थकबाकी मिळणार की नाही, याबाबत माहिती नाही.

शासनाची मंजूरी, पण…. 

दरम्यान  या महागाई भत्त्याला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवलाय. मात्र त्यावर एसटी महामंडळाने अजून परिपत्रक काढलेलं नाही. त्यामुळे आता महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष असणार आहे.