देश
Amul च्या मॅनेजमेंटमध्ये मोठा बदल; RS Sodhi यांचा राजीनामा, कोण सांभाळणार धुरा?
गुजरात को-ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) चे एमडी आरएस सोढी (RS Sodhi) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिली आहे. GCMMF चे सीईओ जयेन मेहता (Jayen Mehta) आता आरएस सोढी यांची जागा घेणार आहेत. GCMMF हे सामान्यपणे ब्रँड अमूलच्या नावाने ओळखला जाते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयेन मेहता यांना सध्यातरी तात्पुरत्या स्वरूपात ही जबाबदारी देण्यात आली आहे.
1982 साली सोढी यांनी कंपनीसोबत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी कंपनीमध्ये सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून करियरला सुरुवात केली होती. यानंतर तो 2000 ते 2004 पर्यंत कंपनीचं जनरल मैनेजर (मार्केटिंग) म्हणून पदभार स्विकारला होता. जून 2010 मध्ये त्यांना अमूलचं एमडी बनवण्यात आलं होतं. ज्यानंतर गेल्या 13 वर्षांपासून ते एमडी म्हणून त्यांनी कंपनीची धुरा सांभाळली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोढी यांना एमडी पदावरून हटवण्याचा निर्णय गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशनटच्या बोर्ड बैठकीत घेण्यात आला. मुख्य म्हणजे, सोढी यांना 2017 मध्ये 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती आहे.
दुसरीकडे जिन जयेन मेहता यांना एमडी पदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या 31 वर्षांपासून ते अमूल या ब्रँडसोबत काम करत आहेत. जयेन मेहता यांनी कंपनीचे ब्रँड मॅनेजर, ग्रुप प्रोडक्ट मॅनेजर आणि जनरल मॅनेजर म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सध्याच्या घडीला ते कंपनीमध्ये चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदाची धुरा सांभाळली आहे.
कंपनीबद्दल बोलायचं झालं तर, अमूल ही देशातील डेअरी उद्योगातील दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कंपनीची वार्षिक उलाढाल ही जवळपास 61 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. अमूल फूड आणि FMCG सेक्टरमधील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही संपूर्ण जगातील आठवी सर्वात मोठी डेअरी संस्था मानली जाते.