Menu

अपराध समाचार
ॲसिड हल्ल्यात डोळे गमावलेल्या कोल्हापुरातील दाम्पत्याला अखेर न्याय मिळाला, ‘त्या’ चोरट्याला जन्मठेपेची शिक्षा

nobanner

मंगळसूत्र हिसकावताना चोरट्यांनी फेकलेल्या ॲसिडमुळे डोळे गमावलेल्या गुरव दाम्पत्याला अखेर न्याय मिळाला आहे. त्यांच्यावर ॲसिड फेकणाऱ्या एका चोराला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे गुरव दाम्पत्याला पाच वर्षांनी का होईना, पण अखेर न्याय मिळाला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे या गावात पाच वर्षांपूर्वी एका रात्री दोन दारुड्या भुरट्या चोरट्यानी पाच ग्रॅमचे मंगळसूत्र चोरण्यासाठी गाडीवरून चाललेल्या कल्लाप्पा उर्फ परशुराम लक्ष्मण गुरव व त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांच्यावर ॲसिड फेकले. या हल्ल्यात परशुराम गुरव आणि रेणुका गुरव या दोघांनाही डोळे गमावले. यानंतर संपूर्ण गाव त्यांच्या मागे उभे राहिले आणि ॲसिड हल्ला करणाऱ्या एका आरोपीला २२ फेब्रुवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयाच्या माध्यमातून या दाम्पत्याला न्याय मिळाला असला तरी या घटनेत गुरव दाम्पत्याने आपले डोळे गमावले. जेव्हा यांच्यावर ॲसिड हल्ला झाला त्यावेळी पासून त्यांच्या डोळ्यावर उपचार करण्यासाठी तब्बल साडेतीन लाखाहून अधिकचा खर्च आला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या मदतीतून आणि शेती गहाण ठेवून त्यांनी उपचार घेतले. या दाम्पत्याला दोन मुलं असून या दोन्ही मुलांचे शिक्षण सुरू आहे. दोन्ही मुलांना शिकवून मोठं करायचं अशी या दाम्पत्याची इच्छा असली तरी या घडलेल्या घटनेमुळे त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या मिळालेल्या मदतीच्या जोरावर त्यांनी आता पोल्ट्री फार्मचे काम सुरू करत असून सध्या आयुष्यभरासाठी त्यांच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. पोलिसांनी वेळीच अशा प्रकारचे ॲसिड हल्ले करणारे किंवा या भुरट्या चोरांवर वेळीच बंदोबस्त केले तर गुरव सोबत घडलेली घटना ही अन्य कोणासोबत ही घडणार नाही एवढे मात्र नक्की.