देश
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे काम ‘या’ ठिकाणी शेतकऱ्यांनी पाडले बंद
मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Highway) पहिला टप्पा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला आहे. (Samruddhi Mahamarg) शिर्डी ते नागपूर दरम्यानचा मार्ग सुरु करण्यात आला आहे. असे असले तरी समृद्धी महामार्गाचे काम सुरुच आहे. काही ठिकाणी या महामार्गाला विरोध होत आहे. आता शेतकऱ्यांनी विरोध करत काम बंद पाडले आहे. (Samruddhi Highway News)
पर्यायी रस्त्यासाठी जागा न सोडल्याने मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचे काम शिवडे गावातील शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे. समृद्धी महामार्गासाठी बांधण्यात येणाऱ्या भिंतीचे काम सिन्नरच्या शिवडे – शिवारात शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतीमाल काढण्यासाठी शिवार रस्त्यांना जागा सोडावी. शेतात जाण्याकरता किमान दहा फुटांचा रस्ता सोडण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत येथील सुरु असलेले काम बंद पाडले आहे.
बीएससीपीएल कंपनीकडून शिवडे परिसरात समृद्धी महामार्गाचे काम करण्यात येत आहे. या महामार्गाच्या दोन्ही बाजूला भिंत बांधण्यात येत असून भिंतीचे काम सुरू करताच शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्त्याकरिता जागा न सोडताच भिंतीचे काम सुरु केल्याने शेतकऱ्यांनी याबाबत कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्याचवेळी सुरु असलेले काम रोखले.
दरम्यान, समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा सुरु करण्यासाठी जोरदार काम सुरु करण्यात आले आहे. ( Mumbai Nagpur Samriddhi Highway) त्यासाठी जमीन अधिग्रहन करण्यात येत आहे. राज्यात वाद निर्माण झालेला समृद्धी महामार्गाचे सुमारे 50 टक्के जमीन संपादन पूर्ण झाले आहे. नाशिक जिल्ह्यात खासगी 1100 हेक्टर जमीन लागणार त्यात 500 हेक्टर जमीन सरकारने ताब्यात घेतली. यात शासकीय 100 हेक्टर लागणार असून 42 टक्के ताब्यात दिली आहे. या महामार्गाला ठाणे आणि नाशिक जिल्हात विरोध झाला होता, पण याच ठिकाणी सुमारे 50 टक्के जमीन संपादन केली गेली आहे.
समृद्धी महामार्गासाठी साधारण 9 हजार हेक्टर जमीन लागणार त्यात खासगी 7400 हेक्टर , त्यात 3700 संपादित केली आहे. या जमिनीचे 6074 खरेदीखत झाले असून त्यात दहा 200 शेतकरी आहे. तर ठाणे जिल्ह्यात खासगी 500 हेक्टर जमीन लागणार असून शासकीय 250 हेक्टर आहे. आतापर्यंत दोन्ही 450 हेक्टर जमीन सरकारने संपादन केली.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.