Menu

देश
Gold Silver Price : स्वस्तात सोने खरेदीची सुवर्णसंधी, पाहा तुमच्या शहरातील आजचे दर एका क्लिकवर

nobanner

सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून सोने-चांदीत (gold silver price) पुन्हा तेजी दिसून आली आहे. आज भारतात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,150 रुपये आहे. तर आदल्या दिवशी किंमत 51,800 होती. म्हणजेच सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याचे दर 55,780 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर आधी 56,500 रुपये होते.

शहर सोन्याचे दर (10 gram) चांदीचे दर (1kg
दिल्ली 55, 780 रु. 65, 550 रु.
मुंबई 55, 630 रु. 65, 550 रु.
चेन्नई 56, 320 रु. 67, 500 रु.
कोलकाता 55, 630 रु. 65, 550 रु.
बेंगळुरू 55, 680 रु. 67, 500 रु.
अहमदाबाद 55, 680 रु. 65, 550 रु.
मुंबईतील सोन्याचे दर
आर्थिक राजधाना असलेल्या मुंबईत (mumbai gold price) प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 55, 630 रुपये आहे. तर यूपीची राजधानी लखनऊमध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,150 रुपये आहे. आदल्या दिवशी किंमत 51,800 होती. आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज राजधानीत प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 55,780 रुपये आहे, जो काल 56,500 रुपये होता. म्हणजे आज भाव कमी झाला आहे.

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (Indian Standard Organization) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.

जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24K सोने विलासी असले तरी ते दागिने बनवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलद्वारे दर जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

हॉलमार्ककडे लक्ष द्या
सोने खरेदी करताना लोकांनी त्याच्या गुणवत्तेची काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्कचे चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना भारतीय मानक ब्युरो अंतर्गत नियम आणि विनियमांद्वारे नियंत्रित केली जाते.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.