देश
पुढील 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती
केरळमध्ये दाखल झालेल्या मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात झाली असून आज कर्नाटकाचा काही भाग व्यापला आहे. पुढील ४८ तासात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी कोकणात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. अनुकूल वातावरण असल्यामुळे पुढील 48 तासात मान्सून गोव्याच्या किनारपट्टीसह महाराष्ट्रातही धडकण्याची शक्यता आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत महाराष्ट्र, गोवा भागामध्ये पावसाचं आगमन होऊ शकतं. नैऋत्य मान्सून आज पश्चिम किनारपट्टीवरील कर्नाटकातील कारवारपर्यंत पुढे सरकलेय. पुढील ४८ तासांत गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागात तो आणखी सरकण्याची शक्यता आहे.
अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सून केरळमधून पुढे सरकलाय. कर्नाटकच्या काही काही भागात हजेरी लावली आहे. त्याशिवाय बंगालच्या उपसागारचा भागही व्यपला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्राचा मध्य भाग आणि गोवा, महाराष्ट्रच्या किनारपट्टीला मान्सून धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, नियोजित वेळेपेक्षा आठवडाभराने मान्सून केरळमध्ये उशीराने दाखल झाला. 1 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होते, पण यंदा तो उशीरा दाखल झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून उशीराने दाखल होत आहे.
आत्तापर्यंतचा मुंबईतील मान्सूनचा इतिहास पाहिला तर मान्सूनचे आगमन मुंबईत कधीच वेळेत झाले नाही. गेल्या दोन दशकातील मान्सून आगमनाच्या तारखा पाहिल्या तर मुंबईत मान्सून हा सरासरी 10 जूनपर्यंत मुंबईत दाखल होतो. केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर कधी चक्रीवदळचा (Cyclone) अडथळा तर कधी कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सून रखडतो. हे सगळे पार झाल्यानंतर मान्सून जरी कोकणात दाखल झाला तरी मुंबईकरांना मात्र वाट पाहावी लागते.त्यामुळे मुंबईत मान्सून हा आतापर्यंत कधीच जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेला नाही. पावसाचा प्रवास कधी अंदमान, कधी केरळ असा रेंगाळतो तर कधी पश्चिम किनारपट्टीवरून पुढे सरकणारी पावसाची शाखा रखडते. दरम्यान पूर्व किनारपट्टीवरून कधी पाऊस त्याचा प्रवास सुरू ठेवतो आणि आंध्र – विदर्भातून राज्यात दाखल होतो. मुंबई मात्र मान्सूनची कायमच प्रतीक्षा करते.
उन्हाच्या तडाख्यापासून सुटका मिळण्याची वाट पाहत आहेत. एकीकडे केरळमध्ये पाऊस पोहोचला आहे. पण, मुंबईसह राज्यातील काही भागांत अजूनही उन्हाचा फटका बसत आहे. त्यामुळे सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.