Menu

देश
ग्राहकांचे बजेट कोलमडणार! 24 तासात सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

nobanner

सुवर्ण नगरी अशी ओळख असलेल्या जळगावात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळे 1000 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात चक्क एक हजार रुपयांची वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे.

बजेट कोलमडणार
ऐन लग्नसराई मध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांचे बजेट कोलमडणार आहे.आज सोन्याचे भाव जीएसटी सह 65 हजार 400 रुपये प्रतितोळे आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी आणि गुंतवणूक वाढल्याने सोन्याच्या दरात अचानक वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

किंमती कमी होतील
दरम्यान सोन्याच्या किंमती येणाऱ्या दिवसांमध्ये कमी झालेल्या पाहायला मिळतील, असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. आधी सोन्याचा भाव 63 हजार रुपये 10 ग्राम इतके होते. गेल्या महिन्यात किंमतींमध्ये तेजी पाहायला मिळाली.

जागतिक स्तरावर सोने
शुक्रवार 5 एप्रिल 2024 ला डिलीव्हरी होणारे सोने आज 62 हजार 560 रुपये 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे. आज सकाळी सोने 62 हजार 567 रुपये होते.तर 5 जून 2024 ला डिलीव्हरी होणारे सोने आज कमी होऊन 62 हजार 937 रुपयांवर ट्रेड करत आहे.

एमसीएक्स एक्सचेंजवर शुक्रवारी 5 मार्च 2024 ला डिलीव्हरी होणारी चांदी 69 हजार 905 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे. तर 3 मे 2024 रोजी डिलीव्हरी होणारी चांदी 71 हजार 490 वर व्यवहार करत आहे.

सोन्याच्या जागतिक किंमतीत उतार झाल्याचे पाहायला मिळाले. कॉमेक्सवर सोन्याच्या जागतिक किंमतीत व्यवहार दर 0.20 टक्के किंवा 0.10 डॉलर मंदावून 2,054.60 डॉलर प्रति अंशावर ट्रेड करताना दिसला. तर सोने जागतिक स्तरावर 2046.40 डॉलप प्रति अंशावर ट्रेड करताना दिसले.

सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये गेल्या काही दिवसात उतार पाहायला मिळत आहे. यात सलग उतार पाहायला मिळत आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.