Menu

देश
Maharashtra Rain Updates: कोकण, उत्तर महाराष्ट्रात येत्या तीन-चार तासांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा अंदाज

nobanner

धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस
धाराशिव तालुक्यातील खानापुर गावात घरावर वीज पडल्याने घराचे नुकसान. राञी साडेआठ ते नऊच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसात घरावर पडली वीज. घरातील टिव्ही,फॅन,कुलर,एसीसह,फ्रीज जळाल्याने मोठे नुकसान. नुकसानीचा पंचनामा करुन शासनाने मदत देण्याची ग्रामस्थ जाधव यांची मागणी. धाराशिव शहरासह तालुक्यातील राञी विजेच्या कडकडाटासह झाला मुसळधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आल असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे. तसेच मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे आदेश मच्छ विभागाने दिले आहेत.

पावसाने जून महिन्याची सरासरी आठवडाभरातच ओलांडली
सोलापूर जिल्ह्यात मागील सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळं जून महिन्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद या आठवड्याभरात झाली आहे. सोलापुरात अनेक वर्षानंतर जून महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. सोलापूर जिल्ह्यात जून महिन्यात एकूण 102 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना कालपर्यंत 103 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. पुढील काही दिवस देखील हे पाऊस असेच असण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे एप्रिल में महिन्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या सोलापुरात बदललेल्या वातावरणामुळे बळीराजा सुखावला आहे.

सोलापुरात आठवडभराच्या पावसाने बळीराजा सुखावला, नद्या-बंधारे तुडुंब भरले
एप्रिल आणि मे महिन्यात दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला आठवडाभरात झालेल्या पावसाने काहीसा दिलासा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात आठवडाभर सर्व दूर पाऊस पाहायला मिळतोय. तुफान बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी, बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बंधारांमध्ये पाणी मुबलक प्रमाणात साठा झाला आहे. पावसाने उसंत घेतल्यानंतर जमिनीत वापसा होताच खरीप पिकाच्या पेरणीला वेग येणार आहे.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.