Menu

देश
‘2.5 तासांसाठी मला….’, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर गंभीर आरोप; ‘याचा पश्चाताप…’

nobanner

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वातील मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प (Budget 2024) 23 जुलैला सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अर्थसंकल्प कसा असेल याबद्दल सांगितलं. आम्ही एक मजबूत अर्थसंकल्प मांडणार आहोत, जो 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून सादर करण्यावर केंद्रीत असेल. आगामी पाच वर्षं आमच्यासाठी फार खास आहेत असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले की, अनेक खासदारांना त्यांच्या मतदारसंघाचे प्रश्न मांडण्याच्या संधीपासून वंचित राहावं लागलं. कारण काही पक्षांनी “नकारात्मक राजकारण” केल्याने संसदेचा वेळ वाया गेला आहे. यावेळी त्यांनी सर्वपक्षीय खासदारांना राजकीय मतभेद बाजूला ठेवून विधायक चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सभागृहाला संबोधित करत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या घोषणांचा संदर्भ देत नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली. संसदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या निषेधाचा उल्लेख करत ते म्हणाले की, लोकांनी निवडलेल्या सरकारला “असंवैधानिकरित्या शांत” करण्याचा प्रयत्न होता. ते म्हणाले, “पंतप्रधानांना अडीच तास शांत करण्याच्या प्रयत्नांना लोकशाही परंपरेत स्थान असू शकत नाही आणि याचा पश्चात्तापही नाही”.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.