देश
Mumbai Mantralaya News : मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरुन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; अधिकाऱ्यांना सांगितलं धक्कादायक कारण
मुंबईत मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न आला. काम होत नसल्याच्या रागातून या व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
व्यक्ती मंत्रालयाच्या इमारतीबाहेरील सज्जावर बसला होता. पाचव्या मजल्यावरुन तो उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न करत होता. मात्र तेथील अधिकाऱ्यांकडून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मंत्रालयाच्या खिडकीतून अधिकारी त्या व्यक्तीशी बोलण्याचा, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. अधिकाऱ्यांशी बोलताना त्याने, वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या मारूनही काम होत नसल्याने हा व्यक्ती संतापला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्या व्यक्तीची समजूत काढल्यानंतर क्रेनच्या साहाय्याने सदर जेष्ठ नागरिकास खाली उतरवण्यात आलं आहे.
याआधीही मंत्रालयातून अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मंत्रालयात संरक्षण जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. मात्र सुरक्षा जाळी लावल्यानंतरही काही जणांनी जाळीवर उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ५२ वर्षीय व्यक्तीने मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली होती. पण मंत्रालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सेफ्टी नेट लावल्याने तो व्यक्ती त्या संरक्षण जाळीत पडला आणि त्यााच त्याचा जीव वाचला.
बोरिवलीमध्ये राहणारे ५२ वर्षीय अरविंद बंगेरा हे वडापावचा व्यवसाय करतात. ते बीएमसीच्या एका अधिकाऱ्यामुळे त्रासले होते, तीच तक्रार घेऊन ते मंत्रालयात आले होते. मात्र बराच काळ वाट पाहूनही कोणी न भेटल्याने, तसंच या लोकांनी जगणं मुश्किल केलं असल्याचं म्हणत त्यांनी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता.
त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने मंत्रालयासमोर स्वत:ला जाळून घेतल्याचा भीषण प्रकार समोर आला होता. ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत मंत्रालयाच्या गेटवर आत्महत्येचा प्रयत्न झाला होता. अंपंगांची पेन्शन दीड हजारवरुन तीन हजार करावी यासाठी रमेश मोहिते अपंग जनता दलाचे उपाध्यक्ष यांनी हा आत्महत्येचा जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.