Menu

देश
Devendra Fadnavis Maharashtra CM: आनंद आहेच पण जबाबदारी वाढलीय, पहिल्या भाषणात दूरदृष्टीची झलक,देवेंद्र फडणवीसांचे टॉप 10 मुद्दे

nobanner

आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) यांची निवड करण्यात आली. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड केली. या सर्व निवड प्रक्रियेनंतर आता देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झाले आहे. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांचे आभार मानले. एकमताने माझी विधिमंडळ गटनेतापदी निवड केली. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक होती. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं. तर मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं पहिलं भाषण, काय काय म्हणाले?, टॉप 10 मुद्दे
1. सगळ्यांचे आभार की एकमताने माझी विधीमंडळ गटनेतापदी निवड केली…
2. यावेळची निवडणूक अतिशय ऐतिहासिक…
3. एक है तो सेफ है हे या निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केलं.
4. मोदी है तो मुमकीन है हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झालं.
5. महाराष्ट्राच्या जनतेनं जे बहुमत दिलं आहे त्याकरता मी जनतेला साष्टांग दंडवत घालतो.
6. इथं मनानं उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आभार मानतो.
7. ज्या प्रक्रियेनं आपण निवडून येतो त्या संविधानाची 75 वर्षं पूर्ण होतायत म्हणून हे महत्वाचं आहे.
8. माझ्याकरता भारताचं संविधान सगळ्यात महत्वाचं..प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला.
9. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीवर्षी मी त्यांना नमन करतो…
10. भगवान बिरसाामुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन…
11. आपले सगळ्यांचे लाडके श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांना नमन करतो.
12. आपली प्राथमिकता आपण सुरू केलेली योजना आणि महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे नेण्याकरता आपण कार्यरत राहू…
13. 2019 साली जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता, दुर्दैवानं तो कौल हिसकावून घेत जनतेशी बेईमानी केली होती.
14. सुरूवातीच्या अडीच वर्षांच्या काळात राज्यात आपल्या आमदांराना त्रास दिला गेला तरीही एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही…
15. माननीय मोदीजींचे मी आभार मानतो, की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी बसवलं
16. आपल्याला कुणीतरी मोठं करावं म्हणून आपण राजकारणात आलो नाही…
17. लार्जर इंटरेस्टमधे आपण एकत्र काम करू…कधीतरी काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात, काही मनाविरूद्ध होतात तरीही लार्जर इंटरेस्टमधे आपण सगळ्याशी जुळवून घेऊ…

विधिमंडळात काय घडलं?
भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विधिमडंळ गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला पंकजा मुंडे यांनी अनुमोदन दिले. चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या प्रस्तावाला प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे यांच्यासह अनेकांनी अनुमोदन दिले. यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून महाराष्ट्रात आलेले विजय रूपानी यांनी देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्याचं जाहीर केले. देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर होताच विधिमंडळात ‘देवाभाऊ’च्या घोषणा देण्यात आल्या. देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर – 02
———————
एकूण – 288

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2

भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष

जनसुराज्य शक्ती – 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष – 1 (शिवाजी पाटील- चंदगड)

भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.