Menu

देश
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?

nobanner

विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत(Ladki bahin Scheme) परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी झाल्याचं समोर येत आहे . लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचं दाखवून बोगस लॉगिन आयडी तयार केले आणि त्याद्वारे चक्क 1171 अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं . प्रत्यक्षात हे भामटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचे पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाच्या तपासात समोर आले आहे .(Bogus applications)

याबाबत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय .ज्या दोन लॉगीन वरून 111 अर्ज दाखल झाले आहेत त्यापैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत .यानंतर अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे . चार ऑक्टोबर 2024 रोजी या प्रकरणात बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता .एकूण 22 अर्ज हे खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचे तपासात समोर आले आहे .

लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थी रॅकेट !
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरू झाली होती .या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्यांची रक्कम लाभार्थी महिलांना मिळाली असून एका लाभार्थी महिलेला 10 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली आहे . दरम्यान लाडकी बहीण योजनेत बोगस अर्ज वाढले असून लातूर सांगली जिल्ह्याच्या नावाने लॉगिन आयडी बनवून परराज्यातील लाभार्थ्यांचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे . राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचे लॉगिन आयडी बनवून तब्बल 1171 अर्ज लाडकी बहीणमध्ये झाल्याचे समोर आले आहे . म्हणजेच 12,295,500 एवढी रक्कम या खात्यांमध्ये जमा झाली . यारजान पैकी 22 अर्ज हे एकट्या बार्शी तालुक्यातील आहेत. केवळ दोन लॉगिन वरून 1171 अर्ज दाखल झाले आहेत .

लाडकी बहीणमध्ये अर्जांचा घोळ कसा झाला ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये परराज्यातील बोगस लाभार्थ्यांचे रॅकेट समोर आले .लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत केवळ दोन लॉगिन वरून वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या नावाखाली 1171 अर्ज दाखल झाले .अर्ज दाखल केलेल्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील रहिवासी असल्याचा दाखवण्यात आलं आहे .परंतु प्रत्यक्षात मात्र हे भामटे उत्तर प्रदेश आसाम पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधील असल्याचं पोलीस महसूल व महिला बाल विभागाच्या तपासात पुढे आले .

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.