अपराध समाचार
वैष्णवी प्रकरणी खळबळजनक दावा! हगवणेच्या वकिलाने चारित्र्यावर घेतला संशय; म्हणाला ‘तिचे नको त्या व्यक्तीसोबत…’
- 314 Views
- May 28, 2025
- By crimesoch
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on वैष्णवी प्रकरणी खळबळजनक दावा! हगवणेच्या वकिलाने चारित्र्यावर घेतला संशय; म्हणाला ‘तिचे नको त्या व्यक्तीसोबत…’
- Edit
वैष्णवी हगवणे प्रकरणी आज हगवणे कुटुंबाला कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय घेतला. वैष्णवीच्या चॅटमधील व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे. ती कोणाशी तरी चॅट करत होती. कदातिच तिने त्या व्यक्तीबरोबर वाद झाला असेल म्हणून आत्महत्या केली असेल असा दावा वकिलाने केला आहे. दरम्यान पती, सासू आणि नणंद यांना 1 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 3 दिवसांची म्हणजे 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोर्टात नेमकं काय घडलं?
वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे, पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. सरकारी वकील यांनी युक्तिवाद करताना म्हटलं की, “तपास योग्य दिशेन चालू आहे. अटक आरोपींचे मोबाईल तपासणी करायची आहे. त्यात काही व्हिडिओ असण्याची शक्यता आहे. आरोपींनी वैष्णीवीचे सोने कुठे गहाण ठेवलें आहे आणि किती ठेवले आहे याची तपासणी करायची आहे”. पती, सासू आणि नणंद यांना 1दिवसांची पोलीस कोठडीची, तर सासरा आणि दिर यांना पुन्हा 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.
आरोपीच्या वकिलांनी मात्र मीडिया ट्रायल सुरु आहे सांगत कोठडी वाढवू नये अशी मागणी केली. “अजून पोलिसांना काय तपासायचं आहे. चुकीच्या पद्धतीने तपास सुरू आहे. निलेश चव्हाण याने बाळाला सांभाळण्याचं काम केलं आहे तरी त्याला आरोपी केलं. आरोपींचे मोबाईल जप्त केले आहेत मग अजून कशासाठी वेळ हवा आहे? या प्रकरणी मीडिया ट्रायल चालू आहे. खरा तपास होणे गरजेचे आहे,” असा युक्तिवाद त्यांनी केला.
“काही चॅट लवपले जात आहेत. कोणतेही संयुक्तिक कारण वाटत नाही. आरोपीची लाइफ स्टाईल महागड्या गाड्या वापरण्याची आहे. वैष्णवीच्या चॅटमधील व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे. ती कोणाशी तरी चॅट करत होती. कदातिच तिने त्या व्यक्तीबरोबर वाद झाला असेल म्हणून आत्महत्या केली असेल,” असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.