Menu

देश
आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज नाही, नवे अ‍ॅप लॉन्च, जाणून घ्या

nobanner

आता आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. युजर्स आपली ओळख डिजिटल पद्धतीने पडताळून पाहू शकतील. कारण, आता आधार कार्डचे नवे अ‍ॅप आले आहे. ते तुमचे काम सोपे करेल, चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया.

सध्या हे अ‍ॅप फक्त प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. म्हणजेच आयफोन युजर्ससध्या हे अ‍ॅप वापरू शकणार नाहीत. आधारच्या या नव्या अ‍ॅपमध्ये काय खास आहे आणि त्याचा वापर कसा करायचा? जाणून घेऊया.

काय आहे नवे आधार अ‍ॅप?
हॉटेल, विमानतळ, सिम किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाताना आपल्या आधार कार्डची फोटोकॉपी देण्याची गरज भासणार नाही. आधार शेअरिंग अतिशय सुरक्षित आणि सोपे करण्यासाठी हे नवे अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने कोणताही युजर आपली ओळख डिजिटल पद्धतीने व्हेरिफाय करू शकणार आहे. यासाठी तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी सबमिट करण्याची गरज भासणार नाही.

इन्स्टॉल कसे करावे?
हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड फोन असणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या फोनवरील गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधार सर्च करावं लागेल. यानंतर तुम्हाला आधारशी जोडलेल्या अ‍ॅप्सची यादी दिसेल. यापैकी दुसऱ्या क्रमांकाचे अ‍ॅप तुम्ही तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करू शकता. इथे दोन गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम हे अ‍ॅप तुमच्या त्याच फोनमध्ये इन्स्टॉल करा ज्यात तुमच्या आधारशी सिमकार्ड जोडलेले आहे. हे पेमेंट अ‍ॅप्स वापरण्यासारखेच आहे. तसेच अ‍ॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी UIDAI ने बनवलेले योग्य अ‍ॅप इन्स्टॉल करत आहात की नाही, हे तपासावे.

कसे वापरावे?
सर्वप्रथम तुमच्या आवडीची भाषा निवडा
आता तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल
फोनमध्ये आधारशी लिंक सिमकार्ड असावे
लिंक मोबाईल नंबरवर मेसेज पाठवला जाईल
आता तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय दिसेल
या ठिकाणी सर्कलमध्ये चेहरा ठेवून पडताळणी करा
आता तुम्हाला 6 अंकी पिन सेट करण्यास सांगितले जाईल
पिन कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला अ‍ॅप्लिकेशनमध्ये लॉग इन केले जाईल.

आधार अ‍ॅपमध्ये काय होणार?
या आधार अ‍ॅपमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला QR कोड दिसेल. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही तुमचा आधार क्रमांक जिथे शेअर करू इच्छिता तिथे डिजिटल पद्धतीने शेअर करू शकाल. याशिवाय अ‍ॅपमध्ये डिजिटल पद्धतीने आधार शेअर करण्यासाठी शेअर आयडीचा पर्यायही मिळेल.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.