Menu

खेल
Sanjay Raut on Asia Cup Trophy Ind vs Pak Final: 15 दिवसांपूर्वी मोहसीन नक्वीसोबत फोटो काढून हात मिळवलात, आता देशाला कशाला मूर्ख बनवताय? संजय राऊत टीम इंडियावर भडकले

nobanner

संजय राऊत म्हणाले की, ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळत आहात, ज्याला देशाचा विरोध आहे. पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल अनेक ठिकाणी सामना दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी आधी काहीतरी हस्तांदोलन केले नाही. अरे पण तुम्ही खेळलात ना.

तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? (Sanjay Raut on Team India)
काल तुम्ही जिंकले असे आम्हाला कळले. आम्ही काही ते बघत नाही. मोहसीन नक्वी ज्या कौन्सिलवर आहेत त्या कौन्सिलवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पुढारी देखील आहेत. काल तुम्ही त्यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण तुम्ही खेळलात ना. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वीसोबत याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? (Sanjay Raut on Team India)
संजय राऊत पुढे म्हणाले की, मैदानावर स्वरूप वेगळं आहे आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? हे आता लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तुम्ही सामना खेळलाच का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी भारतीय खेळाडूंवर निशाणा साधला.

भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम (Sanjay Raut on Jay Shah)
जय शाह आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डवर महाराष्ट्रातील खेळाडू दिसत नाहीत. हे ठरवून सुरू आहे का? हा प्रश्न मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे की असे का होत आहे? अनेक भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.