अपराध समाचार
प्रायव्हेट बेटावरचे ‘प्रायव्हेट’ Photo; बेडरूम, पूल आणि… जगातील सर्वात मोठ्या S*x रॅकेटचा पर्दाफाश करणारं ठिकाण अखेर समोर!
- 2 Views
- December 04, 2025
- By crimesoch
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on प्रायव्हेट बेटावरचे ‘प्रायव्हेट’ Photo; बेडरूम, पूल आणि… जगातील सर्वात मोठ्या S*x रॅकेटचा पर्दाफाश करणारं ठिकाण अखेर समोर!
- Edit
संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरलेलं आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवणारं सेक्स रॅकेट आणि त्यासंदर्भातील काही अशा गोष्टींचा खुलासा टप्प्प्याटप्प्यानं केला जात आहे ज्यामुळं प्रस्थापितांना दणका बसण्याची शक्यता आहे. यामध्ये येणारं एक महत्त्वाचं नाव म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. नुकतंच या प्रकरणात अमेरिकी ओवरसाईट समितीच्या डेमोक्रॅट सदस्यांनी या प्रकरणात दोषी असणाऱ्या जेफरी एपस्टीनच्या खासगी बेटाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. हे तेच ठिकाण आहे जिथं बऱ्याच काळापासून अल्पवयीन मुली आणि महिलांचं लैंगिक शोषण आणि मानवी तस्करी केली जात होती. ज्यामुळं या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होत आहे
कधीही न पाहिलेलं चित्र जगासमोर…
नव्यानं समोर आलेल्या पुराव्यांमध्ये अमेरिकेच्या वर्जिन आयलंडमधील ‘लिटील सेंट जेम्स आयलंड’चे फोटो आणि काही व्हिडीओ समितीनं जारी केले आहेत. यामध्ये बेडरुम, बाथरुम आणि काही विचित्र खोल्याचे फोटो समोर आले आहेत. जिथं एका खोलीत दंतचिकित्सांकडे गेल्यावर दिसणारी खुर्ची, त्याच खोलीतील भिंतीवर असणारे मुखवटे लक्ष वेधत आहेत. एका फोटोमध्ये लँडलाईन टेलिफोन दिसत असून त्यावर डॅरेन, रिच, माईक, पॅट्रिक, लॅरी अशी नावं स्पीड डायलवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
फोटोंव्यतिरिक्त या बेटावर असणारी आकर्षक आणि महागडी सजावट लक्ष वेधत आहे. जिथं अनोख्या पायवाटा, पाम ट्री, समुद्र दिसेल अशा ठिकाणी असणारा स्विमिंग पूल, आतमध्ये असणारा स्टडी रूम जिथं असणाऱ्या फळ्यावर, ‘power, deception, plots, political’ असे शब्द लिहिल्याचं आढळलं. काही छायाचित्रांवर महिलांची नावंसुद्धा आढळली. मात्र ती सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणास्तव जारी करण्यात आली नाहीत असं समितीनं स्पष्ट केलं.
सदर खळबळजनक खुलासा करणाऱ्या समितीच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ही छायाचित्र एपस्टीनच्या ‘मन हेलावणाऱ्या, हादरवणाऱ्या’ विश्वाचा पर्दाफाश करत असून ते पीडितांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी जारी केले जाणार आहेत. दरम्यान अमेरिकेच्या संसदेनं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एपस्टीन प्रकरणाशी संबंधित उर्वरित सर्व पुरावे सार्वजनिक स्तरावर प्रसिद्ध करण्याचं आवाहन केलं आहे.
दरम्यान सध्या समोर आलेले हे पुरावे अशा वेळी सादर करण्यात आले आहेत जेव्हा काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी एका कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामध्ये न्याय विभागानं 30 दिवसांच्या आत एपस्टीन संबंधी पुरावे जारी करावेत असा आदेश काढण्यात आला होता.