Menu

देश
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; ‘हे’ रस्ते पूर्णत: बंद, पाहा महत्त्वाची माहिती

nobanner

 संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून ओळखला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. या अनुशंगाने दादरमध्ये काटेकोर वाहतूक बंदोबस्त केला जाणार आहे. या वेळी बंदोबस्ताची तयारी आत्ताच सुरु झाली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त काही रस्ते बंद असतील तर तर काही ठिकाणी वन-वे व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 

वाहतूक बंदोबस्त कधीपासून सुरु होणार?
आजपासून म्हणजेच  4 डिसेंबरपासून चैत्यभूमीला मोठ्या प्रमाणात बुद्ध अनुयायी येण्याची शक्यता असल्याने मुंबई वाहतूक पोलिसांनी दादर, शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी परिसरात तीन दिवसांसाठी वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. ही विशेष व्यवस्था शुक्रवार 5 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून रविवार 7 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. स्थानिकांना गर्दीचे मार्ग टाळता यावे यासाठी मुंबई पोलिस त्यांना पर्यायी मार्गावरून जाण्याचे आवाहन करत आहेत. माहापरिनिर्वाण दिनाच्या वाहतूक बंदोबस्तासाठी जवळजवळ 450 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.  

कोणते रस्ते बंद असतील?
महापरिनिर्वाण दिनी स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून हिंदुजा रुग्णालयापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे. मात्र हिंदुजा रुग्णालय परिसरातील रहिवाशांना एस. बँक जंक्शनकडून डावीकडे वळून पांडुरंग नाईक रोड मार्गे राजा बडे चौकापर्यंत जाता येईल. त्याशिवाय एस.के. बोले रोडच्या उत्तरेकडील लेनवरून सिद्धिविनायक मंदिर जंक्शनपासून पुर्तगाली चर्च जंक्शनपर्यंत एका मार्गिकेवरून वाहतूक सुरु राहणार आहे.

या विशेष वाहतूक नियोजनामुळे चैत्यभूमी परिसारतील अनुयायी आणि स्थानीकांच्या गर्दीवर नियंत्रण करता येईल.  या वेळी वाहनचालकांनी आणि स्थानिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनाचे पालन करणे आवश्यक आहे. सर्वांना सुरक्षितरीत्या प्रवास करता यावा यासाठी पोलिसांना सहकार्य करा.