Menu

देश
अनाकलनीय! समुद्रावरून वाहणार उष्ण वारे, मुंबई- कोकणात यलो अलर्ट; पर्वतीय राज्यांमध्ये पावसासह हिमवर्षाव

nobanner

मार्च महिन्यामध्ये देशभरात हवामानाची एक ना अनेक रुपं पाहायला मिळाली. हा महिना सरत असतानासुद्धा उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत हवामानात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांनी हवामान तज्ज्ञांनाही चिंतेत पाडलं आहे. एकिकडे शेती आणि फलोत्पादनावर याचा थेट परिणाम होत असताना ऋतूचक्रामध्ये झालेल्या या बिघाडामुळं नागरिकांना आरोग्याच्याही अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात सध्या जिथं मैदानी भूभागावर सूर्यकिरणं आखी तीव्र होत आहेत तिथंच पर्वतीय राज्यांमध्ये मात्र अद्यापही थंडीचे दिवस कायम असल्याचच चित्र आहे. 

केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या पूर्वानुमानानुसार येत्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानात बऱ्याच अंशी चढ- उतार पाहायला मिळतील. तर, दिल्ली आणि मध्य भारतात मात्र पावसाची हजेरी असेल. 

मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेची लाट! 

मुंबई शहर व उपनगरांसह ठाणे, पालघर आणि कोकण किनारपट्टी परिसरामध्ये पुन्हा एकदा उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील किनारपट्टी भागांमध्ये उष्मा आणखी वाढणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. परिणामी या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, पारा 38 अंशांच्या जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मे महिन्यात जाणवणारा उष्णा यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली होती. किंबहुना पाच वर्षांत पहिल्यांदाच मार्चमध्ये कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचलं त्यानंतर मात्र तापमानात घसरण सुरू झाली आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला. 

हवामानाचे हे बदल नेमके कशामुळं? 

हवामान विभागाच्या माहितीनुसार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे मुंबई आणि नजीकच्या भागांमध्ये लाट धडकणार आहे. सध्या कर्नाटकच्या दक्षिणेपासून चक्राकार वारे वाहत असून मध्य महाराष्ट्र ते मनारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टासुद्धा सक्रिय आहे ज्यामुळं दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा इथं पावसाचासुद्धा इशारा जारी करण्यात आला आहे. कोकणासह मुंबईत मात्र प्रचंड दमट हवामानाची स्थिती असेल. 

देशात हवामान बदलांचं सत्र सुरूच!

एकिकडे उत्तर प्रदेश, पंजाबमध्येही पावसासाठी पूरक स्थिती असतानाच दुसरीकडे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या उंच शिखरांमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टीचा इशारा जारी करण्याक आला आहे. नव्यानं सक्रिय झालेल्या पश्चिमी झंझावातामुळं पर्वतीय राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आणि मध्यम स्वरुपातील हिमवर्षावाचा अंदाज असून, त्यामुळं मैदानी ठिकाणं प्रामुख्यानं शिमला, मनाली, मसूही इथंही तापमानात काही अंशांची घट अपेक्षित आहे. 

About the Author