देश
‘अशा मुलींच्या अंगप्रदर्शनामुळेच भारतामध्ये तरुणींवर बला#* होतात’, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर प्रसिद्ध रॅपरचं वादग्रस्त वक्तव्य
बॉलीवूड अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर खुशी मुखर्जी बोल्ड लुकवर एका प्रसिद्ध रॅपरने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘अशा मुलींमुळे भारतात जास्त रेप होतात’ असे वक्तव्य या गायकाने केले आहे. रॅपर सँन्टी शर्मा याने त्याचा instagram वर खुशी मुखर्जीचा बोल्ड लुक शेअर करत त्यावर हे वक्तव्य केले आहे. सोशल मीडियावर लहान मुलंही असतात. सोशल मीडियावर सगळ्यांसमोर असे कपडे दाखवणं चुकीचं असल्याचंही त्याने म्हटलं.
या वक्तव्याने सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे. अनेकांनी रॅपरच्या असंवेदनशील कमेंटवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केले आहेत. अनेकांनी त्याला ‘व्हिक्टिम ब्लेमिंग ‘ करत असल्याचे म्हटले आहे. (Santy Sharma)
नेमका प्रकार काय ?
अभिनेत्री खुशी मुखर्जीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका बोल्ड फोटो आणि व्हिडिओवरून रॅपर सॅन्टी शर्मा याने सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत वादग्रस्त वक्तव्य केले. तो म्हणाला, ” अशा मुलींमुळे भारतात बलात्कार जास्त होतात. सोशल मीडियावर लहान मुलंही असतात, त्यामुळे आपण असा कंटेंट पोस्ट केला पाहिजे जो सभ्य आणि समाजासाठी योग्य असेल. प्लॅटफॉर्म्स आणि जबाबदार लोकांनीही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
“सोशल मीडियावर उघडपणे असे कपडे दाखवणं योग्य नाही, कारण ते लहान मुलंही पाहतात. अशा कंटेंटवर कडक नियम आणि नियंत्रण असणं आवश्यक आहे. दीदी, आपल्याला विनंती आहे की आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य खराब करू नका.” असेही तो म्हणाला. त्याने खाली इन्कलाब झिंदाबाद असा # वापरला आहे .
सोशल मीडियावर रंगली चर्चा
या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वाद उफाळला आहे. नेटकरी रॅपर सॅन्टी शर्माच्या या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत. अनेक जण त्याच्यावर असंमवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल टीका करत आहेत. कुणी काय घालावं आणि काय नाही हे ठरवण्याचा अधिकार हा त्या व्यक्तीचा असतो. असं काहींनी म्हटलं. तर काहींनी त्याच्या वक्तव्याला समर्थन देत सांस्कृतिक प्रभाव आणि सोशल मीडिया कंटेंट यावर चर्चा होणे गरजेचे असल्याचे म्हटलं.
कोण आहे ख़ुशी मुखर्जी ?
खुशी मुखर्जी ही बॉलीवूड अभिनेत्री मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युअन्सर आहे. ती MTV Splitsvilla 10, तसेच लव स्कूल 3 या लोकप्रिय रियालिटी शो मधून चर्चेत आली. तिने काही साउथ इंडियन आणि हिंदी चित्रपटांमध्ये ही काम केले आहे. तिच्या बोर्ड फॅशन स्टाईल आणि वेब सिरीज मधील भूमिकांची कायम चर्चा होत असते.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.