Menu

देश
Gas Shortage Thane News: एलपीजीच्या टंचाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार, एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मोठा निर्णय, ‘या’ नंबरवर फोन करा अन्…

nobanner

इराण-इस्राईल युद्धाच्या (Iran Israel War) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर (Gas Cylinder) सुरळीत पुरवठयाबाबत राज्य शासन विविध उपाययोजना राबवत आहे. आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावरून उठलेल्या वादळाला तोंड देण्यासाठी ठाणे (Thane) जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र आहे. अशातच आता प्रशासननाने 24 तास कंट्रोल रुम कार्यान्वित केली आहे. नियंत्रण कक्षाचा हेल्प लाईन क्रमांक 8169230665 जारी केला आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा  (Gas Cylinder) पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि संभाव्य टंचाई टाळुन गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.

गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समितीमध्ये पोलीस प्रशासन, जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच सरकारी तेल कंपन्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, वाहतूक आणि वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी समिती दररोज परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

Thane LPG Cylinder : 24 तास कंट्रोल रुम कार्यान्वित, सध्या तरी तुटवडा नाही, जनतेने घाबरून जाऊ नये

युध्दजन्य आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर, प्रशासननाने हेल्प लाईन क्रमांक 8169230665 जारी केला असून 24 तास कंट्रोल रुम कार्यान्वित केली आहे. गॅस एजन्सी व पेट्रोलपंप यांना योग्य सुचना दिल्या असुन देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पेट्रोल पंपावर पुरसे इंधन उपलब्ध आहे. सिलेंडर बुक केल्यानंतर 25 दिवसाच्या कालावधीत प्राप्त होत आहे. सध्या तरी तुटवडा नाही, त्यामुळे जनतेने घाबरून जाऊ नये. असे आवाहन शिधावाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी केले आहे.

LPG Shortage युद्धाचा परिणाम आता सणासुदींवर; गुढीपाडव्याला लागणाऱ्या साखरेच्या हारकडेची नाशिकमधील कारखाने बंद

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सणासुदींवर देखील होताना पाहायला मिळत आहे.सध्या इंधनाच्या तुटवड्यामुळे व्यवसाय ठप्प पडले आहेत. दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला लागणाऱ्या साखरीच्या हरकडे कारखान्याने बंद पडली असून नाशिकमध्ये साखरेपासून बनवले जाणारे हरकडे कारखान्यांवर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्याने कारखाने बंद करण्याची वेळ कारखानदारांवर आली आहे तर दुसरीकडे घेतलेले ऑर्डर देखील कॅन्सल करावे लागत आहे.