Menu

अपराध समाचार
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरातच्या समोर पुजारी, CA, सराफा व्यावसायिकाला बसवलं; 6 तासाच्या चौकशीत चक्रावणारी माहिती समोर, VIP वऱ्हाडींची यादीही तयार

nobanner

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला आज पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याआधी काल एसआयटीकडून अशोक खरातचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एक सराफ व्यवसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार असून काल एसआयटीने सबळ पुरावे गोळा करण्यासाठी दोन मोठ्या कारवाया केल्या. व्यापाराची फसवणूक प्रकरणी अशोक कराडची चौकशी तर, ईशान्येश्वर मंदिरात कोणते कारणामे सुरू होते. याची चौकशी आणि आर्थिक व्यवहार सांभाळणारा सीए याची देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

अशोक खरातच्या 6 तासाच्या चौकशीत चक्रावणारी माहिती समोर- (Ashok Kharat Case)

एसआयटीकडून अशोक खरातची काल पुण्याचा सीए, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफाला समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. एसआयटीनं चौघांची सहा तास चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. या चौकशीतून खडे, रत्न सोन्याच्या बदल्यात अशोक खरात बनवाबनवी करत असल्याची माहिती समोर आली. तसेच पुण्यातील एका बँकेमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाचीही माहिती चौकशी केल्याची सूत्रांची  माहिती आहे. एका बँकेचा मॅनेजर आणि इतरांना मिळून अशोक खरातने एक कोटी रुपयांची लाच दिल्याचा एसआयटीला संशय आहे. त्याचप्रमाणे वाढलेल्या सोन्यच्या किंमतीत खरेदी-विक्रीमध्ये लाखोंचा नफा मिळवल्याची माहिती देखील समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)

व्हीआयपी वऱ्हाडींची यादी तयार करण्याचे काम सुरू-(Ashok Kharat Case)

अशोक खरातचे राजकीय नेत्यांची हितसंबंध असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वऱ्हाडींचा शोध घेतला जाणार आहे. सत्ताधारी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह वरिष्ठ अधिकारी देखील लग्न सोहळ्यात हजेरी असल्याची एसआयटीकडे माहिती आहे. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणेही अशोक खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यात उपस्थित होते. खरातच्या मुलीच्या लग्नात IAS आणि IPS अधिकारी पूर्णवेळ उपस्थित होते. लग्न सोहळ्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी करून अशोक खरात सोबतचे संबंध तपासण्यासाठी व्हीआयपी वऱ्हाडींची यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.अशोक खरातच्या संबंधित असलेल्या नेत्यांच्या भोवती संशयाचा वातावरण असताना काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील एसआयटीकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. 

अशोक खरातच्या घराबाहेर काल काय काय घडलं? (Ashok Kharat Nashik Case)

अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली आहे. अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्याआधी रात्री उशिरापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या. शिर्डीत जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र एसआयटीचे पथक खरातच्या घरी जाण्याअधीच खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाली. तर खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतले.

503 Service Unavailable

Service Unavailable

The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.

Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.