Mumbai News: मुंबई लोकलच्या मेट्रोमनने गमावली नोकरी, कारण फारच विचित्र; नेमकं 11 वाजता घडलं काय?
मुंबईची लाइफलाईन असलेल्यालोकल ट्रेनचेमोटरमन संप करतात तेव्हा मुंबई ठप्प होते. मुंबईकरांनी हा अनुभव अनेकदा घेतला आहे. त्यामुळेच मोटरमनच्या मागण्या, आंदोलन या गोष्टी मुंबईकरांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या ठरतात. मात्र सध्या मुंबई लोकलचा एक मोटरमन त्याच्या निलंबनामुळे चर्चेत आहे. या मोटरमनने नेमकं असं केलं की ज्यामुळे शेकडो प्रवाशांचे हाल तर झालेत पण त्याला नोकरीही गमावावी लागले ते पाहूयात…
घडलं काय?
पश्चिम रेल्वेवरील विरार – दादर 15 डबा जलद लोकलने भाईंदर येथील थांबा चुकविल्याची घटना घडली. प्रवासी जलद लोकल पकडण्यासाठी फलाटावर उतरले. परंतु, लोकल भाईंदर येथे न थांबता पुढे निघून गेली. कार्यालयात जाण्याच्या धावपळीत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. या घटनेमुळे शेकडो प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या प्रवाशांनी पाठीमागून येणारी वातानुकूलित लोकल थांबवली आणि त्यातून प्रवास केला. लोकल थांबा चुकविणाऱ्या मोटरमनचे निलंबन करण्यात आले असून या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
एसी लोकलची दारंच लागेनात
विरार येथून बुधवार, 8 एप्रिल रोजी सकाळी 10.44 वाजता विरार – दादर 15 डबा जलद लोकल सुटली. या लोकलला वसई रोड, भाईंदर, दहिसर, अंधेरी आणि दादर येथे थांबे आहेत. ही लोकल सकाळी 11.01 वाजता भाईंदर स्थानकात येण्याची नियोजित वेळ होती. या लोकलची भाईंदर स्थानकात उद्घोषणा झाली. प्रवासी जलद लोकल पकडण्यासाठी फलाटावर उतरले. परंतु, लोकल भाईंदर येथे न थांबता पुढे निघून गेली. कार्यालयात जाण्याच्या धावपळीत असतानाच घडलेल्या या प्रकारामुळे अनेक प्रवाशांचा खोळंबा झाला. संतप्त प्रवाशांनी भाईंदर येथे सकाळी 11.14 वाजता आलेली विरार – चर्चगेट वातानुकूलित लोकल थांबवली. प्रवासी या लोकलमध्ये चढले. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली. मात्र वातानुकूलित लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. परिणामी, लोकल मार्गस्थ होत नव्हती. यामुळे रेल्वे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात वाद झाला. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.
…म्हणून मोटरमन निलंबित
प्राथमिक तपासात मोटरमनची चूक असल्याचे समोर आल्याने संबंधित मोटरमनला तत्काळ निलंबित करण्यात आले. चौकशीदरम्यान नेमके कारण स्पष्ट होईल, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हणजेच लोकल थांबा चुकवल्याने या मोटरमनने नोकरी गमावली असून त्याची चौकशीही केली जाणार आहे.
Service Unavailable
The server is temporarily unable to service your request due to maintenance downtime or capacity problems. Please try again later.
Additionally, a 503 Service Unavailable error was encountered while trying to use an ErrorDocument to handle the request.