Menu

देश
मंत्री, अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवे आजपासून कायमचे हद्दपार!

nobanner

मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या गाडीवरील लाल दिवा आजपासून इतिहासजमा होणार आहेत. केंद्र सकरानं व्हीआपी कल्चर बंद करण्यासाठी गाडीवर लाल दिवा न लावण्याचा निर्णय घेतला, त्याची अमंलबजावणी आजपासून केली जाणार आहे.

मोदी सरकारानं हा निर्णय घेताच काही मंत्र्यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढून ठेवला होता. पण आता कोणत्याही मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या गाडीला लाल दिवा नसणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांकरीता निळा दिवा वापला जाईल. पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्या अशा अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त निळा दिवा वापरण्यात येईल.

बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणारा रेरा कायदाही आजपासून लागू:

तर दुसरीकडे बिल्डरांच्या मनमानीला चाप लावणाऱ्या रेरा म्हणजेच रियल इस्टेट रेग्युलेशन अॅक्टची आजपासून राज्यात अंमलबजावणी सुरू होणार आहे.

या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर प्रत्येक बिल्डरला प्रकल्पाची नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. याशिवाय घर खरेदी करणाऱ्यांच्या हितासाठी अनेक तरतुदींचा समावेश रेरा कायद्यात करण्यात आला आहे.

केंद्रानं 25 मार्च 2016ला रियल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट कायदा मंजूर केला. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं देखील रेरा कायदा मंजूर करण्याचं निश्चित केलं. त्यासाठी जनतेनं दिलेल्या 750 सूचनांचाही विचार करण्यात आला.