अपराध समाचार
मेट्रोत चोरून व्हिडीओ काढणाऱ्याला तरुणीने अद्दल घडवली
- 252 Views
- May 19, 2017
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मेट्रोत चोरून व्हिडीओ काढणाऱ्याला तरुणीने अद्दल घडवली
- Edit
मेट्रोमध्ये मोबाईलमध्ये चोरुन शूटिंग करणाऱ्या एका भारतीय तरुणाला त्याच महिलेने चांगलाच धडा शिकवला. सिंगापूरमध्ये ही घटना घडली.
उमा मागेश्वरी ही भारतीय वंशाची तरुणी सिंगापूरमधल्या मेट्रोमधून प्रवास करत होती. त्याचवेळी सूरज नावाचा एक तरुण अख्खी मेट्रो रिकामी असताना तिच्या समोरच्या सीटवर जाऊन बसला आणि मोबाईलवर काम करण्याच्या बहाण्याने उमाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु केले.
पण त्याचवेळी सूरजच्या मागे असलेल्या काचेवर त्याच्याच मोबाईलचे प्रतिबिंब उमाला दिसले. सूरज आपले चित्रिकरण करत असल्याचं उमाच्या निदर्शनास आले. उमाने कोणताही गोंधळ न करता, आधी आपला मोबाईल काढला आणि सूरज चित्रिकरण करत असल्याचं रेकॉर्डिंग केलं. जो व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.
सुमारे दोन मिनिटांच्या चित्रिकरणानंतर उमाने मेट्रोच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली. अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर सूरजची भंबेरी उडाली. सुरक्षा रक्षकांनी त्याचा मोबाईल जप्त केला आणि त्यात अशाप्रकारचे अनेक व्हिडिओ असल्याचं समोर आलं. काही अश्लील व्हिडिओही सापडले.
दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर उमाने फेसबुकवर एक पोस्ट लिहून अशा विकृतांपासून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही, तर या पोस्टसोबत तो व्हिडिओही शेअर केला. ज्याला 13 तारखेपासून आतापर्यंत तब्बल 50 लाख लोकांनी पाहून शेअरही केला आहे.