Menu

देश
दहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाकडे, 7 ऑगस्टला सुनावणी

nobanner

दहीहंडीचा वाद सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाकडेच परत पाठवला आहे. येत्या 7 ऑगस्टला मुंबई हायकोर्टात दहीहंडीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 2014 मध्ये हायकोर्टानं दही हंडीच्या उंचीवर आणि त्यात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या वयावर निर्बंध लादले होते.

सुप्रीम कोर्टानं याप्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजनांची राज्य सरकारकडे विचारणा करण्याचे निर्देश दिले आहेत. जर हायकोर्टाला योग्य वाटलं तर हायकोर्टानं या निर्बंधावर विचार करुन ते हटवायचे की ठेवायचे यावर निर्णय घ्यावा असं सुप्रीम कोर्टांनं म्हटलं आहे.

दहीहंडीवेळी होणारे अपघात लक्षात घेता 2014 साली हायकोर्टानं दहीहंडीची उंची 20 फुटांहून कमी आणि गोविंदांचं वय 18 वर्षांहून कमी ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र दहीहंडी आयोजकांनी यावर नाराजी व्यक्त करत कोर्टात धाव घेतली होती.