Menu

देश
पाकिस्तानचा ‘टेररिस्तान’ झालाय!; संयुक्त राष्ट्रसंघात भारताने ठणकावले

nobanner

दहशतवादाने पीडित असल्याचे सांगून मगरीचे अश्रू ढाळणाऱ्या पाकिस्तानवर आज भारताने संयुक्त राष्ट्रसंघात जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तान हा टेररिस्तान झाला आहे. दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे. दहशतवादी तयार करण्यात येत आहेत, असा जोरदार हल्ला भारताने केला आहे.

पाकिस्तानने कोणत्याही प्रकारच्या गैरसमजुतीत राहू नये. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. पाकिस्तान दहशतवाद्यांचा गड झाला आहे. जगाला पाकिस्तानकडून मानवाधिकारे ज्ञान नको, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानची खरडपट्टीच काढली. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. त्यांच्या भूमीत दहशतवाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ओसामा बिन लादेन आणि मुल्ला उमर यांसारख्या दहशतवाद्यांना आश्रय देणारा पाकिस्तान पीडित असल्याचा दावा करत आहे याचे आश्चर्य वाटते. पाकिस्तानमध्ये हाफिझ सईदसारखे दहशतवादी बसले असून ते दहशतवादी कारवाया करत आहेत, असेही भारताने संयुक्त राष्ट्रसंघात म्हटले आहे.
दरम्यान, याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाकान अब्बासी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात भारतावर आरोप केले होते. पाकिस्तानविरोधातील दहशतवादी कारवायांमध्ये भारत सामील असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याशिवाय काश्मीर प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सोडवला पाहिजे, असा ‘फुकट’ सल्ला दिला होता. भारताला पाकिस्तानबरोबर शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करायचे नाहीत, असा कांगावा केला होता. काश्मीरसाठी विशेष दूत नियुक्त केला पाहिजे, असेही ते म्हणाले होते.