Menu

देश
एअर इंडियाच्या विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न , प्रवाशाला अटक

nobanner

इटलीच्या मिलान येथून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात एका भारतीय प्रवाशाने थेट वैमानिक कक्षात (कॉकपिट) घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर विमान पुन्हा विमानतळावर वळवण्यात आले. जवळपास २५० जणांना घेऊन उड्डाण केलेल्या या विमानाला अवघ्या ३० मिनिटांतच माघारी वळावं लागलं. विमानतळावर उतरताच त्या प्रवाशाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन ऑगस्ट रोजी ही घटना घडली. ३२ सी क्रमांकाच्या आसनावर बसलेल्या गुरप्रीत सिंग या प्रवाशाने ‘कॉकपिट’मध्ये जाण्यासाठी अरेरावी सुरू केली. हुज्जत घालत असलेल्या या प्रवाशामुळे विमान पुन्हा माघारी वळवून त्या प्रवाशास पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकारामुळे विमानाला जवळपास अडीच तासांपेक्षा जास्त उशीर झाला. दरम्यान संबंधित प्रवाशावर विमान प्रवासाच्या बंदीची कारवाई होऊ शकते असे संकेत एअर इंडियाने दिले आहेत.