Menu

देश
देश कठीण परिस्थितीतून जातोय, असहिष्णूता वाढली

nobanner

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मानवाधिकारांचे हनन, वाढती असहिष्णूता तसेच देशातील जास्तीत जास्त पैसा श्रीमंतांच्याच खिशात जात असल्याने गरीब-श्रीमंतांची वाढलेली दरी यावरुन चिंता व्यक्त केली आहे. प्रणब मुखर्जी फाऊंडेशनद्वारे आयोजित एका संमेलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मुखर्जी म्हणाले, देश सध्या एका अवघड परिस्थितीतून जात आहे. ज्या भूमीने वसुधैव कुटुंबकम आणि सहिष्णूतेचे धडे जगाला दिले आहेत. त्याच भूमी आता असहिष्णुतेत वाढ, मानवाधिकारांचे उल्लंघन आणि दंगलींमुळे चर्चेत आहे. सध्या सरकारी संस्थांवरचा जनतेचा विश्वास उडाला आहे.