अपराध समाचार
ठाण्यात नवरा-बायकोचा किरकोळ वाद, आईसह दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
- 284 Views
- March 11, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ठाण्यात नवरा-बायकोचा किरकोळ वाद, आईसह दोन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
- Edit
ठाण्यात नवरा-बायकोमध्ये झालेला किरकोळ वाद दोघांच्या जिवाशी आला आहे. भिवंडीमध्ये नवऱ्याबरोबर किरकोळ भांडण झाल्यानंतर पत्नीने स्वतःला पेटवून घेतले. या आगीत भाजल्याने तिच्यासह दोन वर्षाच्या चिमुरडीचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घघटनेत पतीही गंभीर जखमी झाला आहे. सस्मिता मलिक आणि दोन वर्षाची चिमुरडी सुबोस्त्री मलिक अशी मृत मायलेकींची नावं आहेत.
भिवंडीजवळील भाडवड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका चाळीच्या खोलीत मलिक कुटुंब राहते. नवरा-बायकोमध्ये झालेल्या किरकोळ वादातून टोकाला जाऊन २८ वर्षीय सस्मिताने स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. पाहता पाहता ही आग संपूर्ण घराला लागली आणि आगीचा मोठा भडका उडला. या आगीच्या भडक्यात सस्मितासह पती रतिकांत आणि दोन वर्षीय चिमुरडी सुबोस्त्री भाजल्याने गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान पत्नी आणि दोन वर्ष सुबोस्त्री चिमुरडीचा मृत्यू झाला. रतिकांत गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उचपार सुरू आहेत.